| अलिबाग | प्रतिनिधी |
निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी, पर्यावरणाची जोपासना करण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी डिफेन्स अकॅडमीने कनकेश्वर येथील ऐतिहासिक डोंगरावर विशेष वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले. अकॅडमीच्या योग टीमने या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत, डोंगरावर विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. डोंगरावर डिफेन्स ॲकेडमीकडून हिरवाईचा संकल्प हाती घेण्यात आला.
या मोहिमेचे विशेष वैशिष्ट्ये म्हणजे वृक्षारोपणासाठी लागणारी सर्व रोपे डिफेन्स ॲकेडमीच्या मुख्य प्रशिक्षक अमिषा भगत यांनी त्यांचे वडिल अनिरुद्ध भगत यांच्या वाढदिवसानिमित्त भेट दिली. पर्यावरणाप्रती असलेली त्यांची ही अनोखी श्रद्धा आणि वडिलांच्या वाढदिवसाला दिलेली ही अविस्मरणीय भेट खरोखरच प्रेरणादायी ठरली. या महत्त्वाकांक्षी मोहिमेला संस्थेचे संस्थापक समरेश शेळके यांची उपस्थिती लाभली. त्यांनी या मोहिमेत सहभाग घेऊन वृक्षारोपण केले.
डिफेन्स अकॅडमीने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे केवळ कणकेश्वर परिसरातील पर्यावरणाची स्थिती सुधारण्यास मदत होणार वृक्षारोपणासाठी
प्रेरणा मिळेल अशी आशा आहे. भविष्यातही असेच पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याचा डिफेन्स ॲकेडमीचा मानस असल्याचे सांगण्यात आले. यावेळी उपस्थितांनी पर्यावरणाच्या संवर्धनाची शपथही घेतली. यावेळी सन्नी शेलार, अनिकेत म्हामुणकर, अक्षय पाटील, सागर हिसाळके या प्रमुख सदस्यांसह डिफेन्स
अकॅडमीचे सर्व योग प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.