धारावीतील एकाला लागण झाल्याची खबर पक्की
। दिल्ली । वृत्तसंस्था ।
जगभरात धुमाकूळ घालणार्या कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटमुळे भारतात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ओमिक्रॉन हा जास्त संसर्गक्षम असून दिल्लीसह मुंबईत रुग्ण आढळला आहे. दिल्लीत एलएनजेपी रुग्णालयात टांझानियातून परतलेल्या रुग्णावर उपाचर सुरु आहेत. तर जवळपास 17 जण टांझानियाहून दिल्लीत परतले असून त्यांचीही टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे.
सध्यास्थितीत देशात ओमिक्रॉनचे 5 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये कर्नाटकात 2, महाराष्ट्रात 2 आणि दिल्लीत एक रुग्ण आहे. भारतात सर्वात पहिल्यांदा कर्नाटकात दोन रुग्ण सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात डोंबिवलीत कोरोनाचा पहिला रुग्ण शनिवारी आढळला होता. त्यानंतर आता धारावीतसुद्धा कोरोनाच्या या नव्या व्हेरिअंटचा रुग्ण वाढल्यानं महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं आहे.