। पोलादपूर । वार्ताहर ।
तालुक्यातील कोतवाल बुद्रुक येथे मंजूर झालेल्या प्रकल्पाच्या आढावा बैठकीचे आयोजन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आ.प्रवीण दरेकर यांच्या मागणीनुसार मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांनी केले असता या बैठकीप्रसंगी उपस्थित असलेले महाड विधानसभेचे आ. भरत गोगावले यांनी विधानसभा मतदार संघामध्ये 27 बंधारे व 1 साठवण टाकी मंजूर करण्याची मागणी केली.
महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकारी वसुधा जाधव यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आ.प्रवीण दरेकर यांच्या मागणीनुसार पोलादपूर तालुक्यातील कोतवाल बुद्रुक येथील मंजूर झालेल्या प्रकल्पातील समस्या सोडविण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची सूचना आ.दरेकर, आ.गोगावले, अप्पर आयुक्त जलसंधारण तथा मुख्य अभियंता प्रादेशिक क्षेत्र पुणे, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी ठाणे, जिल्हा जलसंधारण अधिकारी ठाणे यांना पाठविली. त्यानुसार मृद व जलसंधारण मंत्री शंकर गडाख यांच्या मंत्रालयाच्या दालनामध्ये संबंधितांनी मंजूर प्रकल्पाच्या तात्काळ प्रकरणाच्या निविदा कार्यवाहीपासून आजमितीपर्यंतच्या सविस्तर टिपण्णीची माहितीसह उपस्थित राहण्यास सुचित करण्यात आले होते. यावेळी चर्चेदरम्यान महाड विधानसभा आमदार भरत गोगावले यांनी महाड विधानसभा मतदार संघातील 27 बंधारे व 1 साठवण टाकी मंजूर करण्याचे मागणीपत्र शंकरराव गडाख यांना दिले.