अनाधिकृत मिठाई कारखान्यावर कारवाईची मागणी

। उरण । वार्ताहर ।
उरणमधील मिठाई विक्रेते नियमांची पायमल्ली करून व्यवसाय करीत आहेत. याबाबत अनेकवेळा वृत्त प्रसिध्द झाल्या.तसेच अनेक तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे करूनही त्यांच्याकडून कोणतीच कारवाई होत नाही.

मात्र उरणमधील जागृत नागरिक प्रकाश ठक्कर यांनी निवासी इमारतीत सुरू असलेला चंद्रकांत ठक्कर यांचा मिठाई व फरसाण बनविण्याचा कारखाना बंद करण्यासाठी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस खाते व संबधीत विभागाचे प्रशासन विभाग काय कारवाई करते याकडे उरणच्या जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

सदरचा कारखाना हा कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. तसेच या ठिकाणची घरपट्टी,पाणीपट्टी,वीज मीटर आधी निवासाच्या नावाखाली होत आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाचीही परवानगी घेतली नाही.यावरून कारखाना चालविणार्‍यांनी नगरपालिका,वीज प्रशासन व अन्न व औषध प्रशासनाची एक प्रकारे फसवणूक केल्याचे उघड होते. याठिकाणी घरगुती सिलेंडरचा वापर होत असल्याचे बोलले जात आहे. याबाबत पोलीस यंत्रणा,नगरपालिका, वीज व अन्न औषध प्रशासन विभाग काय कारवाई करते की त्यांची पाठराखण करते याकडे उरणच्या जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version