आदिवासी विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत प्रवेश मिळण्याची मागणी

कर्जत । वार्ताहर ।
आदिवासी आश्रम शाळा कारव येथे आदिवासी विद्यार्थ्यांना विज्ञान शाखाला प्रवेश मिळावे अशी मागणी ठाकूर समाज संघटनेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून केली जात आहे. रायगड जिल्हा व ठाणे जिल्हा ठाकूर समाज संघटनेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून उल्हास परिसर प्रतिष्ठान काराव तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे येथे असलेल्या आदिवासी आश्रम शाळा कारव येथे आदिवासी विद्यार्थ्यांना विज्ञान शाखाला प्रवेश मिळावे म्हणून आदिवासी समाज संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.

संस्थेला व मुख्याध्यापक यांना विनवण्या केल्या तसेच शासन स्तरावर पाठपुरावा करून शासनातर्फे तीन वेळा आदेश पारित होऊन सुद्धा मुजोर संस्था चालक व त्यांचे संचालक मंडळ आणि मुख्याध्यापक हे जाणीवपूर्वक संगनमताने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच सारख्या मुलभूत अधिकारापासून वंचित ठेवण्याचे जे काय कटकारस्थाने केले.संस्थाचालक व त्यांचे संचालक मंडळ आणि मुख्याध्यापक यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यान्वये त्यांचेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी रायगड जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यातील आदिवासी संघटनांनी एकत्र येऊन जोरदार मागणी केली आहे. तसा गुन्हा नोंदवण्यासाठी तक्रार अर्ज ठाणे जिल्ह्या ग्रामीण विभागाचे डी वाय एस पी मुरबाड तसेच स्थानिक पोलीस ठाणे बदलापूर यांच्याकडे तक्रार केली आहे.

यावेळी रायगड जिल्हा ठाकूर समाज संघटनेचे अध्यक्ष मालू निरगुडे, ठाणे जिल्हा आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष भगत, नंदा उघडा,अरुणा खाकर, विजया वाघ, रघुनाथ खाकर,अनिल कवटे,परशुराम दरवडा,मंगल केवारी, रमेश उघडा,विलास हिंदोळे,काशीनाथ शिंगवा,काशिनाथ पादिर,पांडुरंग पारधी, गणेश पारधी आदी उपस्थित होते.

Exit mobile version