। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत नगरपरिषदमध्ये लेबर फ्रंट (आयटक संलग्न) कॉ. श्याम गायकवाड यांची युनियन आहे. त्यांनी कर्मचार्यांना दिवाळीपूर्वी बोनस मिळण्याची मागणी एका निवेदनाद्वारे नगरपरिषद प्रशासनाला केली आहे. हे निवेदन लेबर फ्रंट कर्जतचे युनिट अध्यक्ष राहुल डाळिंबकर यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांना दिले आहे. कर्जत नगर परिषदेमध्ये सुमारे 65 कर्मचारी असून प्रत्येकी 28 हजार रूपये बोनस मिळण्याची मागणी युनियन तर्फे करण्यात आली आहे. याबाबत आता नगरपरिषद प्रशासन काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे. यावेळी आस्थापना प्रमुख अविनाश पवार, सभा कामकाज प्रमुख कल्याणी लोखंडे, कर विभाग प्रमुख ऋषिता शिंदे उपस्थित होते.
नगरपरिषद कर्मचार्यांना बोनसची मागणी
