रंगीबेरंगी माठाना मागणी: ३०० ते ४००  रुपयांना विक्री

| माणगाव | वार्ताहर |
 उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. गेल्या काही दिवसात तापमान ३८° c च्या वर जात आहे. उन्हाळी दिवसात सर्वसामान्य लोक पिण्याचे पाणी थंड करण्यासाठी पारंपारिक मडक्यांचा वापर करतात.यामुळे उन्हाळ्यात मातीच्या मडक्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या दिवसात पारंपरिक पद्धतीने बनविलेली मातीची मडकी, माठ, घागर इत्यादी मोठ्या प्रमाणात बनविले जातात. कुंभारवाड्यातील या वस्तूंना उन्हाळ्यात चांगली मागणी असते .गेल्या काही वर्षांपासून कुंभारवाड्यातील पारंपारिक वस्तू बनविण्याचा व्यवसाय कमी होत आहे. त्यातच इतर राज्यातून आलेली मातीची मडकी ठिकठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झाली असून सुबक व आकर्षक अशी ही मडकी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

      मातीची हि मडकी सर्वसामान्यांना आवडत असून या मडक्यांना चांगली मागणी आहे. रंगीत व सुंदर नक्षीकाम केलेली ही मडकीना ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. स्वयंपाक गृहात धातूच्या भांड्यांबरोबर कलाकुसरी युक्त मातीची मडके सर्वांचे लक्ष वेधत आहेत. मातीच्या मडक्यांना रंग देऊन, लहान लहान रंगाचे ठिपके,  इतर सुंदर नक्षीकाम केलेली ही मडकी ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. पक्या रंगात रंगवलेली ही मडकी अलीकडे सर्वत्र उपलब्ध झाली असून रंगीबेरंगी माठांना चांगली मागणी आहे. पारंपरिक मडक्यात रंगबिरंगी माठांना चांगली मागणी आहे. ३०० ते  ४०० रुपयांना ही रंगीबेरंगी मडकी विकली जात आहेत. याबरोबरच साधे माठ विकले जात असून त्यांनाही चांगली मागणी आहे.

Exit mobile version