जेट्टीची उभारण्याची मागणी

????????????????????????????????????

| आगरदांडा । प्रतिनिधी ।
पदमदुर्ग किल्ल्यावर जेट्टीची उभारणी व्हावी यासाठी पदमदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी याना लेखी निवेदन देऊन तातडीने जेट्टीची निर्मिती करा अन्यथा उपोषणास बसण्याचा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

सदरचे निवेदन गायकर यांनी जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक,मुरुड तहसीलदार ,मुरुड पोलीस ठाणे व मेरी टाइम बोर्डाचे मुरुड येथील बंदर निरीक्षक याना देण्यात आले आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, मुरुड हे पर्यटन स्थळ असून येथे वर्षाला पाच लाख पर्यटक भेटी देत असतात.जंजिरा किल्ल्याप्रमाणेच असंख्य पदमदुर्ग किल्ल्यास भेट देण्यास उत्सुक असतात.

परंतु या किल्ल्यावर अगदी सहज जात येत नाही.मोठ्या होडीमधून छोट्या बोटीद्वारे उतरावे लागते ते सुद्धा कम्बर भर पाण्यात उतरून मगच पदमदुर्ग किल्ल्यावर पोहचता येते.हे खूप अवघड असल्याने येथे मेरी टाइम बोर्डाने जेट्टी बांधणे खूप आवश्यक आहे. पर्यटकांना किल्ल्यावर सहज चढता उतरता यावे यासाठी मेरी बोर्डाचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी ते उपोषणास बसण्याचा त्यांनी इशारा दिला आहे.

Exit mobile version