खोपोली विश्रामगृह परिसरात उद्यान उभारण्याची मागणी

| खोपोली | वार्ताहर |

खोपोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृह परिसरात सुसज्ज उद्यान विकसित केले जावे, अशी मागणी रिपाईंतर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना देण्यात आले आहे. आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडीक यांनी हे निवेदन सादर केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, खोपोली शहर अध्यक्ष नितीन वाघमारे उपस्थित होते.

विश्रामगृहाची सध्या अतिशय दुरावस्था झाली आहे.विश्रामगृहाची संरक्षक भिंत ढासळलेली आहे. विश्रामगृहाच लोखंङी प्रवेशव्दाराला मोठमोठी दगङ लावून आधार देण्यात आला आहे. याशिवाय विश्रामगृहाचा परिसर पूर्णपणे पालापाचोळा आणि कच-याने भरून गेला आहे. याठिकाणी खानसामा, सुरक्षारक्षक नसल्याने राञीच्या वेळेस या इमारतीचा गैरवापर होत आहे. आज खोपोलीत जागेचे भाव गगनाला भिङले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील अङीच एकर जागेत असलेल विश्रामगृह मरणासन्न अवस्थेत आहे. असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

या ठिकाणी सुसज्ज उद्यान उभारण्यासाठी बांधकाम विभागाने विश्रामगृहाची जागा खोपोली नगर परिषदेस हस्तांतरीत करावी आणि सदरील जागेत सुसज्ज उद्यान उभारल्यास लहान मुले आणि वयोवृध्दांसाठी विरंगुळ्यासाठी सोय होईल असेही महाडीक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

Exit mobile version