जीर्ण झालेल्या रस्त्याचे काम करण्याची मागणी

| उरण । वार्ताहर ।
उरण-पनवेल रस्त्यावरील फुंडे बस स्टॉप जवळील जीर्ण झालेल्या पुलाचे काम तसेच उरण-करंजा कोस्टल रोडच्या नव्याने डांबरीकरण करण्याचे काम सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी तातडीने हाती घ्यावे अशी मागणी संबधीत विभागाच्या अधिकार्‍यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी संदेश ठाकूर, सत्यवान भगत, राकेश भोईर, मंगेश वाजेकर, अंकुश तांडेल, सोमनाथ घरत, दीपक सुतार, सुनील भोईर, धनंजय भोरे, रितेश पाटील, दिनेश हळदणकर, सतीश पाटील उपस्थित होते.

Exit mobile version