फी सवलती बद्दल साकडे

| नेरळ | प्रतिनिधी |

मुंबई विद्यापीठांतर्गत येणार्‍या बहुतेक सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणार्‍या मागासवर्गीय शासनाकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती दिल्या जात असतात. मात्र काही शैक्षणिक संस्था यांच्याकडून संबंधित गटातील विद्यार्थ्यांना त्या सवलती देण्याबाबत अनेक अडचणी समोर केल्या जातात. त्या अडचणी शासनाने हस्तक्षेप करून दूर कराव्यात अशी मागणी बहुजन विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आली असून, तशा आशयाचे निवेदन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग संचालक यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून करण्यात आली आहे.

अभियांत्रिकी, वैद्यकीय, वास्तूविशारद महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणार्‍या मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून शैक्षणिक फी मध्ये सवलती देत नाहीत. याबद्दल बहुजन विद्यार्थी संघटनेने राज्याचे शिक्षण तंत्र संचालक डॉ. अभय वाघ यांची भेट घेवून विद्यार्थ्यांवर होणार्‍या अन्यायाबाबत आणि अशा काही संस्था विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी अनिल वाणी, सुजल गायकवाड, मारुती देवघरे, ऋत्विज आपटे धर्मेश परमार, बळीराम ऐनकर, नेरळ शहराध्यक्ष तबरेज खान, कृष्णा जाधव, फरहान नझे आदी. उपस्थित होते.दरम्यान,उच्च आणि तंत्र संचालक डॉ वाघ यांनी बहुजन विद्यार्थी संघटनेच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल असे आश्‍वासन दिले.

Exit mobile version