पुरप्रतिबंधक उपाययोजनाची मागणी

। मुरुड । प्रतिनिधी ।
अतिवृष्टीमुळे मुरुड तालुक्यातील मजगाव, खारीकवाडा,उसरोली,आदाड व वाळवटी इत्यादी गावात खाडीला आलेल्या पुरामुळे तेथील ग्रामस्थांच्या घरांमध्ये पाणी शिरून अन्नधान्य, दुचाकी वाहने,चारचाकी वाहने,टीव्ही ,फ्रीझ,घरातील फर्निचर,कपडे इत्यादी अनेक वस्तूंचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तसेच या गावांतील भातशेतीमध्ये वाळू वाहून आल्यामुळे किंवा जमिनीचा वरचा थर वाहून गेल्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे तसेच या गावांतील रस्त्याचा वरील डांबरीचा थर वाहून गेला आहे.
मजगाव आरावघर रस्ता हा आता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. खलाटीकडील रस्त्याचा भाग पुरामध्ये वाहून गेला आहे तेथील पोफळी,वांद्रे,वेळास्ते,वावे इत्यादी गावांना हा रास्ता जोडला गेला आहे. पूरग्रस्तांना मजगाव ग्रामपंचायत मार्फत अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले व झालेल्या नुकसानीची मजगाव ग्रामपंचायतमध्ये नावानिशी नोंद करण्यात आली आहे , भविष्यात शासनाकडून पुरग्रस्थांना झालेल्या नुकसानीबाबत आर्थिक मदत येईलही परंतु पुन्हा पुरच येऊ नये म्हणून काही उपाययोजना झाल्यास या पंचक्रोशीतील नागरिकांना कायमस्वरूपी फायद्याचे होईल,यापूर्वी खारलँड विभागामार्फत खाडीच्या बंधार्‍याची दुरुस्ती होत असे परंतु खारलँड विभागाकडे ग्रँट नसल्यामुळे ही कामे होत नाहीत ,मजगावची खाडी ही डोंगरातील गाळ येऊन पूर्णपणे भरली आहे. त्यातच भर म्हणजे मजगाव गावातील छोटा जुना पूल तुटून तोसुद्धा खाडीत पडलेल्या अवस्थेतच आहे या खाडीतील गाळ उपसून खाडीच्या बंधार्‍याची उंची वाढवून उघडयांची संख्या वाढवल्यास पुराचा धोका काही प्रमाणात कमी होईल असे येथील जेष्ठ नागरिकांचे मत आहे, तरी शासनाने यावर तज्ञांमार्फत पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी या भागातील ग्रामस्थांची मागणी आहे.

Exit mobile version