| खरोशी | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाट विभागात वाशीनाका ते वाशी ही नवीन वसाहत, काळेश्री कान्होबा भाल, मोठे भाल, तुकाराम वाडी, जनवली, नारवेल, बेनवले, घोडा बंदर, बहीराम कोटक, तामसी बंदर, मळेघरवाडी, वढाव, दिव, कणे, बोर्झे लाखोले अशा अनेक वाड्या आहेत. या वाड्यातील लोकांना वाशीनाका येथील रस्ता ओलाडतांना तारेवरची कसरत करावी लागते. मागील 2010 ते 2022 वर्षात रस्ता ओलाडतांना अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे पेण वाशी नाका येथून वाशी खारेपाट विभागात जाण्यासाठी उड्डाण पुलाची मागणी सी.आर. म्हात्रे यांनी केली आहे.







