| पनवेल | प्रतिनिधी |
कामोठे सेक्टर 34 व 35 परिसरात मालवण तडका आणि नीलकंठ हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ दररोज गंभीर स्वरूपाची वाहतूककोंडी होत आहे. रस्त्याची रुंदी कमी असतानाही दोन्ही बाजूंना अनियमितपणे वाहनांची पार्किंग होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याबाबत शिवसेना उपशहर प्रमुख कामोठे सचिन त्रिमुखे यांनी वाढत्या वाहतूक कोंडी व अनियमित पार्किंगबाबत तातडीने कार्यवाही करण्याबाबत पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन दिले आहे.
पाणवळ्याच्या समोर रस्त्यावर चारचाकी आणि दुचाकी वाहने अनधिकृतपणे उभी केल्यामुळे मार्ग अत्यंत अरुंद होऊन वाहतूक ठप्प होते. अनेकवेळा अपघाताच्या घटना टळल्या आहेत. यामुळे दैनंदिन वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होत असून पादचारी, शाळकरी मुले व जेष्ठ नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत पनवेल महापालिकेच्या संबंधित विभागाने अनियमित व अनधिकृत पार्किंगवर दंडात्मक कारवाई, परिसरात योग्य व अधिकृत पार्किंग झोनची व्यवस्था, वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक मार्गदर्शक फलक, नो-पार्किंग चिन्हे व रेषांकन आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील अडथळे व अतिक्रमण तातडीने हटवण्याचाही मागणी करण्यात आली आहे.
वाहतूक कोंडीवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606