आपचे अॅड. अजय उपाध्ये यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनी आपचे पदाधिकारी अॅड. अजय उपाध्ये यांनी लाक्षणिक उपोषण केले. महामार्गासाठी तब्बल 15 हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या खर्चाबाबत चौकशी करण्यात यावी, रस्त्यावरील प्रवास करणार्या नागरिकांना 1 लाख रुपये भरपाई द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.
गेल्या 12 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. सध्या या महामार्गावर ठिक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे यामार्गावरुन प्रवास करणे कठिण झाले आहे. अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. याबाबात सरकार, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना काही देणेघेणे राहीलेल नाही. या विरोधात आम आदमी पार्टीने 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या मार्गावर आतापर्यंत 15 हजार 555 कोटी रुपये खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या खर्चाची समितीमार्फच चौकशी झाली पाहीजे, अशी मागणी देखील अॅड. उपाध्ये यांनी केली आहे. अलिबागमधील हिराकोट तलावासमोर उपोषणाला बसले होते. यावेळी आपचे वेगवेगळे पदाधिकारी उपस्थित होते.