शालेय बस तपासणी करण्याची मागणी

| पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्‍या बस नियमावलीनुसार चालतात की नाही याची तपासणी करण्याची मागणी सुधागड मनसेतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन पेण परिवहन अधिकारी महेश देवकाते यांना देण्यात आले.या विषयावर सविस्तर चर्चा केली असून देवकाते यांनी लवकरच याबाबत कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी भावेश बेलोसे, दिपेश लहाने, शेखर चव्हाण, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version