गतिरोधक बसविण्याची मागणी

Exif_JPEG_420

| बोर्लीमांडला | वार्ताहर |
मुरुड-जंजिरा पर्यटनात साळाव ते मुरुडदरम्यान वाहनांची वर्दळ वाढत आहे. मजगाव स्थानकावर अपघाताची शक्यता लक्षात घेऊन झेब्रा पट्टे मारावेत किंवा गतिरोधक बसवावेत, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नववर्षाच्या स्वागतासाठी मुरुड-जंजिरा, कुडालेणी आदी पर्यटन स्थळे, समुद्र सफरीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी थर्टी फस्ट, शनिवार, रविवारी या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तसेच या ठिकाणी सुटीच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. या रस्त्यावर सातत्याने वर्दळ असते. मजगाव स्थानकादरम्यान अतिवेगाने येणार्‍या वाहनांमुळे अनेक वेळा छोटे-मोठे अपघात झाले आहेत. याठिकाणी वेळप्रसंगी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर झेब्रा पट्टे किंवा गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिक व प्रवासीवर्गातून होत आहे.

Exit mobile version