। पनवेल । वार्ताहर ।
करंजाडे वसाहतीतील सेक्टर 1 ते 6 या मुख्य रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी सिडको कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
करंजाडे वसाहतीमध्ये नव्याने रस्त्यांची डांबरीकरण करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहनचालकांच्या मनमानीला लगाम बसत नसून वाहने अतिशय वेगाने जातात. या मार्गावर अपघात होण्याची दाट शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे डांबरीकरण करण्याचे काम सुरु असतानाच रस्त्यावर मुख्य ठिकाणी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी केली आहे.
रस्त्यांवर गतिरोधक बसविण्याची मागणी
