सोशल मिडीयावर पोन थरानीला न्याय मिळण्याची मागणी

हॅशटॅग जस्टीज फॉर पोन थरानी झाले ट्रेंड

। अलिबाग । वर्षा मेहता ।
गुरुवारी कोईम्बतूरमध्ये गळफास घेतलेल्या प्लस-टू विद्यार्थीनीच्या पालकांनी आरोप केला की, त्यांच्या मुलीला एका शिक्षकाकडून लैंगिक छळाचा सामना करावा लागला आणि तिने टोकाचे पाऊल उचलले. पोन थरानी (17) असे मृत तरुणीचे नाव होते. ती कोईम्बतूरमधील कोट्टाईमेडू येथील मागुडेश्‍वरन यांची मुलगी आहे. पोन थरानी ही चिन्मय विद्यालय मॅट्रिक्युलेशन स्कूलमध्ये प्लस-टूचे शिक्षण घेत होती. तिथे एका शिक्षकाने तिचा लैंगिक छळ केला.
तिने हा प्रकार तिच्या पालकांच्या निदर्शनास आणून दिला आणि काही महिन्यांपूर्वी ती दुसर्‍या शाळेत गेली होती. मात्र, या घटनेमुळे तिला मानसिक धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी घरात कोणी नसताना पोन थरानी यांनी दरवाजाला आतून कडी लावून पंख्याला गळफास लावून घेतला.
यानंतर तिच्या पालकांनी उक्कडम पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीत तिच्या पालकांनी म्हटले आहे की, त्यांच्या मुलीने शाळेतील शिक्षक आणि इतर काही जणांचे नाव असलेली सुसाईड नोट लिहिली होती. त्यामध्ये तिचा लैंगिक छळ केल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे सोशल मिडीयावर पोन थरानीला न्याय मिळण्याची मागणी नेटीझन्सकडून करण्यात आली.

Exit mobile version