करटोल्यांना उरण बाजारात मागणी

| उरण | वार्ताहर |

पावसाळा सुरू झाल्यानंतर सर्वसामान्यांना रानभाज्यांचे वेध लागतात. गेल्या काही दिवसात कोकणात संततधारेमुळे रानावनात तयार होणाऱ्या रानभाज्या मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये विक्रीसाठी येत आहेत. या रानभाज्यांना ग्राहकांची पसंती असून मागणीसुद्धा चांगली आहे.

पावसाळी रानभाजी करटोल्यांना महिलांची पसंती असून ती 200 रुपये किलो दराने मिळत आहे. पावसाच्या सुरुवातीलाच रानभाजी शेवळ तयार झाली असून नंतर रानावनातील झाडाझुडपात आढळणारे रानातील फळ भाजी म्हणजेच करटोली होय. उरण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात करटोलीची भाजी विक्रीसाठी बाजारपेठेतून येत असून यावर्षी एका किलोला दोनशे रुपये एवढा भाव मिळत आहे.

आयुर्वेदानुसार आरोग्यासाठी उत्तम असलेली करटोलीची भाजी सुरुवातीच्या पावसात मिळत असल्याने या भाजीची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. खाण्यासाठी चविष्ट व रुचकर असलेली करटोलीची रानभाजी गृहिणींचीही मोठ्या प्रमाणात पसंती असते उरण तालुक्यातील आदिवासी महिलांना या रानभाज्या विक्रीतून चांगली कमाई होत आहे. उरण बाजारात राज पालनाका, गांधी चौक, आनंद नगर आदि ठिकाणांवरून विकत घेत आहेत.

वेल उगवते साधारणता महिनाभरात करटोलीला फळे येतात ही फळ भाजी खाण्यासाठी अत्यंत रुचकर असल्याने ग्राहकांची चांगली मागणी आहे. यावर्षी दोनशे रुपये प्रति किलोने करटोली ची विक्री केली जात आहे झाडाझुडपात वाढत असणारी कस्टोली आहे. यातून चांगली आर्थिक कमाई होत असून रोजगार मिळत आहे.

सौ .नंदिनी प्रशांत म्हात्रे
(कावाडे -अलिबाग )

पावसाळ्यातील रानभाज्या खाण्यासाठी अत्यंत चविष्ट व रुचकर असतात. करटोलीची भाजी तर आरोग्यासाठी अत्यत गुणकारी अशी आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला काही दिवसच ही भाजी मिळत असल्याने आवर्जुन आम्हीही भाजी खरेदी करतो.

सौ. रजनी मानापुरे
पाल्याची वाडी केगाव (उरण)

Exit mobile version