| नेरळ | वार्ताहर |
केरळ राज्यातील कोलम शहरात इंटरनॅशनल विविध हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन आयोजन केले आहे. केरळ राज्य ग्रामीण विकास, आयोजित प्रदर्शनामध्ये भारतातील विविध राज्यातून आपल्या उत्पादित हस्तकला वस्तूंना भरीव बाजारपेठ मिळवून देण्यात आली आहे. त्यातच माथेरान येथील चामड्याच्या वस्तूंना देशभरात मागणी असते. केरळ राज्यात सुरु असलेल्या आंतराराष्ट्रीय हॅन्डलूम प्रदर्शनात माथेरानमधील चामड्याच्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले आहे. तेथे माथेरानच्या चर्म उद्योगाचे नावलौकिक करण्यासाठी ओम लेदर आर्टने माथेरानमधील चामड्याच्या वस्तूंचे स्टॉल लावले आहेत. माथेरान यामधील चंद्रकांत काळे,हर्षदा काळे यांनी आपल्या उत्पादित वस्तूंना प्रदर्शनात चामड्याचं वस्तू ठेवणयता आल्या आहेत. केरळ राज्यातील प्रदर्शनात सहभाग घेऊन आपल्या व्यवसायासह माथेरानचे नाव सुद्धा वाढवले आहे