खेडेगावासाठी प्रीपेड कार्डाचा मासिकदारात बदल कराण्याची मागणी

रेंज नसल्याने तक्रारीत वाढ
। सारळ । वार्ताहर ।

आजच्या इंटरनेटच्या जगात मोबाइलचे महत्व छोट्याशा खेडेगावामधूनही वाढू लागले आहे. त्यामुळे ग्रामीणभागात राहणारेही त्याचे महत्व जाणत या गोष्टीला अंगीकारायचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच अगदी आदिवाशी समाजा सोबत अशिक्षित असणारी व्यक्तीही स्मार्टफोन परवडत नसल्याने लहान मोबाइल वापरताना दिसतात. पण मोबाइल वापरताना खेडेगावातील प्रत्येक ठिकाणी एकच समस्या आढळते. ती मुख्यता मोबाईलच्या रेंज बाबत आहे. बर्‍याच गांवातून रेंज नसल्याने मोबाईलचा वापर करता येत नसल्याचा तक्रारी वाढत आहेत.
अतिशय दुर्गम भाग असेल, डोंगराळभाग असेल तर रेंजचा मुद्दा समजण्यासारखा आहे. मात्र समुद्रकिनारा असणारा खरिपाटविभागातही मोबाइलला नेटवर्क नसणे, असेल तेव्हा ते एकदमच नगण्य असणे हे नक्कीच दूरसंचार आणि मोबाइल कंपन्याच्या दृष्टीने प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारे आहे. त्यातही हे आता नित्याचे झाले आहे. त्यामुळे प्रीपेड कार्डाद्वारे वापरण्या अगोदर बिलाचे पैसे घेणारी कंपनी सेवादेण्यास अपुरी पडत असेल तर दाद कोणाकडे मागायची असा प्रश्‍न सर्व सामान्य ग्रामस्थांना पडला आहे. प्रीपेड रिचार्ज महिन्याचा केल्यानंतर त्यातील पंधरा दिवस नेटवर्क गायब रहात असेल ह्यात ग्राहकांचे झालेले नुकसान कंपनीतर्फे भरून देण्याची सोय उपलब्ध व्हावी अशी सामन्य ग्राहकांची मागणी आहे.
लाईट, पाऊस वातावरणातील अडथळा यामुळे नेटवर्कचे जाणे हे ठीक आहे, पण वातावरण चांगले असतानाही नवखार, रेवस, मिळखतखार मुख्यता सारळ या गावाठीकांनी बीएसएनएल, वोडाफोन, एअरटेल, आयडिया या सीमकार्डची रेंज बहुतांशी ठिकाणी गायब असते. तर काहीवेळेला मात्र इतर कंपन्याची रेंज गायब असताना जीवोची रेंज असते हे गणित काय आहे हे सामान्य ग्रामस्थांना कळेनासे झाले आहे. आज खेडेगावामधून मोबाइल वापरणार्‍यापैकी प्रीपेड सीम मोबाईल वापरणार्‍याची संख्या 99 टक्के असतानाही मोबाइल कंपनी नेटवर्क वाढवण्यासाठी पुढाकार घेणार नसेल तर खेडी अद्यवत होणार कशी? असा प्रश्‍न सुशिक्षितवर्गाकडून याबाबत उपस्थित केला जात आहे.
आज महिलावर्गाला ही सिलेंडर नोदणीसाठी मोबाईल लागत असल्याने त्यांचा स्वयंपाकही मोबाइलरेंज मध्ये अडकण्याच्या घटना घडत असल्याची माहिती स्थानिक गृहिणीनकडून मिळत आहे. प्रीपेड कार्डाची मुदत संपताच मोबाईल सेवा बंद करण्यासाठी सेकंदभरही न थांबणारी मोबाईल कंपनी ज्या दिवशी नेटवर्क नसेल त्या दिवसाचे ग्राहकाला एक्स्ट्रा दिवस नेटवर्क देण्याचे सौजन्य दाखवत नाही. याबाबत जिल्हा ग्राहकमंचाने पुढाकार घेऊन या मोबाईल कंपन्यांना समज द्यावी अशी भावनाही मोबाईल ग्राहकानकडून व्यक्त होत आहे. खेडेगावातून नेटवर्कची समस्या कायम स्वरूपी मिटवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ग्रामीण भागासाठी वेगळा मार्ग काढावा नाहीतर गावांसाठी प्रीपेड प्लानमध्ये शहरापेक्षा अधिक सूट असावी अशी मागणी ग्रामीण भागातून केली जात आहे.

Exit mobile version