सजावटीसाठी प्लास्टिक फुलांंना मागणी

। पनवेल । वार्ताहर ।

सर्वांच्याच लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन पाच दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असून, यंदा गणरायाची आरास करताना अनेकांनी प्लास्टिक फुलांच्या माळांना पसंती दिली आहे. या रंगीबेरंगी कृत्रिम फुलांच्या माळांची अनेकांना भुरळ पडत असून, यंदा मखरांकडे गणेशभक्तांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

गणपतीच्या हटके मखराचे पर्याय शोधणार्‍या गणेशभक्तांचे लक्ष या कृत्रिम फुलांकडे आकर्षित होत आहे. तर दुसरीकडे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने सजावट करताना इकोफ्रेंडली मखराला प्राधान्य द्यायला हवे, तसेच सण झाल्यावर त्याचे पावित्र्यही जपणे गरजेचे असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. दरवर्षी गणरायाच्या आगमनापूर्वी बाजारपेठ मखराच्या विविध साहित्यांनी बहरून जाते. गणरायासाठी आरास करण्यासाठी फुलांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.

Exit mobile version