रेशन दुकानदारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करण्याची मागणी


। चिपळूण । प्रतिनिधी ।
कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन रेशन दुकानदारांना थंमने पॉस मशिनद्वारे धान्य वाटप करण्यास संघटनेटतर्फे मागणी करण्यात आली होती. मात्र, ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. तसेच अन्य मागण्यादेखील करण्यात आल्या होत्या. त्याकडे देखील शासनाने दुर्लक्ष केले आहे. रेशन दुकानदारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून सोयी सुविधा उपलब्ध करण्यास शासनाला नेमकी कोणती अडचण आहे. असा प्रश्‍न उपस्थित करीत रेशन दुकानदारांनी नेमके करायचे काय? असा संतप्त सवाल रत्नागिरी जिल्हा रेशनिंग दुकानदार केरोसीन मालक-चालक संघटनेचे अध्यक्ष अशोक कदम यांनी उपस्थित करीत तसे निवेदन जिल्हाधिकारी व पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


तसेच संघटनेतर्फे रेशन दुकानदारांना विमा संरक्षण,मास्क,हॅण्ड सॅनिटायझर्स,हॅण्डग्लोज अशा विविध मागण्यांची मागणी करून देखील त्याची दखल शासनाकडून घेण्यात आलेली नाही.एकंदरीत शासनाला रेशन दुकानदारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात शासनाला नेमकी कोणती अडचण आहे. असा संतप्त सवाल रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अशोकराव कदम यांनी उपस्थित केला आहे. तर याकडे रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी लक्ष द्यावे,असे आवाहनदेखील केले आहे.

Exit mobile version