कामार्ले ते कार्लेखिंड रस्ता दुरुस्तीची मागणी


| खारेपाट | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील कामार्ले ते कार्लेखिंड दरम्यान रस्त्याची दैनिय अवस्था झाली असून लहान मोठया खडयांनी सर्वच वाहन चालक त्रस्त झाले आहेत. सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी जनतेची जोरदार मागणी होत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहन चालकांना व ज्येष्ठ नागरिकांना मान, कंबर अशे दुर्धर आजार निर्माण झाले आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग येथील अधिकारी वर्गाने घ्यावी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी लक्ष दयावे अशी जोरदार मागणी जनतेकडून होत आहे.

Exit mobile version