। पेण । प्रतिनिधी ।
विजय म्हात्रेला आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या गुन्ह्यातील आरोपी साजन पाटील याची दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे. मात्र, साजनची आई चैत्राली पाटील यादेखील राष्ट्रवादी काँग्रेस तालुका महिला अध्यक्ष आहेत. त्यांचादेखील पक्षाने राजीनामा घ्यावा, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे.
आजही वाशी विभागात ही चर्चा आहे की, पदाच्या आडून या गुन्ह्यातील फिर्यादींवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींनी चैत्राली पाटील यांचादेखील राजीनामा घ्यावा, अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे. तसेच येत्या दोन दिवसांत विजय म्हात्रेचा मित्रपरिवार राष्ट्रवादीचे रायगडचे खा. सुनील तटकरे यांना भेटून चैत्राली पाटील यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करणार आहेत.
