ग्राहकांचा उदंड प्रतिसाद
। उरण । वार्ताहर ।
उन्हाचा तडाखा वाढण्यापूर्वी उरण बाजारात रोह्याचे गोल्डन शुगर गारेगार कलिंगड दाखल झाले असून नागरिक कलिंगड करतांना दिसत आहेत.ग्राहकाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने व्यावसायिक देखील खूष झालेले आहेत.
कलिंगडाच्या हंगामाची सुरुवात जानेवारी महिन्यात होते.जूनपर्यंत हा हंगाम सुरु असतो.वकाळी पावसामुळे यंदा कलिंगडाचा हंगाम काहीसा लांबणीवर पडला. त्यामुळे पुढील आठवड्यात कलिंगडाची आवक आणखी वाढेल.उन्हाळ्यात मागणी वाढत आहे कलिंगड च्या आकारावरून किंमत ठरविली जाते लहानांत लहान 100 रुपये तर मोठे आकाराचे 210 रुपये अश्या भावाने आम्ही विकतो,असे रोह्या तालुक्यातील तळाघर येथील कलिंगड विक्रेते निशिकांत मधुकर गुरव यांनी सांगितले.
गडद हिरव्या रंगाची कलिंगड शुगर किंग ,गोल्डन शुगर या नावाने ओळखले जातात. फ्रुट सलाड आणि ज्युस बनविण्यासाठी हि कलिंगडे मोठ्या प्रमाणात वापरली जातात. जस जसे तापमान वाढते तशी कलिंगडा ना मागणी वाढत असल्याचे कलिंगड विक्रेती मुक्ता शशिकांत गुरव यांनी सांगितले.
उन्हाची काहिली वाढल्यावर कलिंगड आम्ही विकत घेतो .गोल्डन शुगर व शुगर किंग कलिंगड बाहेरून काळेभोर आणि गर लाल असणारी गोल्डन शुगर कलिंगडे नागरिकांना पसंतीत उतरतात. – मधुकर पेडणेकर ग्राहक (उरण )