वारे ग्रामपंचायतची सर्व्हिस लाईनची मागणी

| नेरळ । वार्ताहर ।

कर्जत तालुक्यातील वारे ग्रुप ग्रामपंचायतमधील सर्व गावांमध्ये ग्रामपंचायतीकडून दिवाबत्तीची व्यवस्था केली आहे. मात्र त्या ठिकाणी महावितरण कंपनीकडून सार्वजनिक वीज वितरण करण्यासाठी आवश्यक असलेली वीज वाहिनी टाकण्यात आलेली नाही. त्याबद्दल स्थानिक ग्रामपंचायत कडून सातत्याने महावितरण कंपनीकडे नवीन सर्व्हिस मार्गिका टाकण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, महावितरणाकडून वारे ग्रामपंचायत मधील नवीन वीज वाहिनी बद्दल महावितरण कंपनी कडून कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याने तेथे विजेच्या खांबावरील दिवे 24 तास दिवसभर सुरू असतात. याबाबत स्थानिक ग्रामस्थ नितीन चवरे यांच्याकडून जिल्हा परिषदकडे ऑनलाईन स्वरूपात तक्रार करण्यात आलेली होती. त्यामुळे ग्रामपंचायतकडे त्याबाबत विचारणा करण्यात आली असून नवीन सर्व्हिस लाईन टाकण्यात यावी असे सूचित केले आहे.

Exit mobile version