रानभाजी संवर्धनाची मागणी

। अलिबाग । वार्ताहर ।
पावसाळा आला की, परिसरातील ग्रामस्थांना ओढ लागते ती रानभाजी खाण्याची रानभाजी बनवण्याची कला तरुणपिढीला अवगत नसली तरी लहानपणीची जिभेवर रेंगाळणारी रानभाजीची चव कोणीही विसरू शकत नाही. मग रानभाजी बनवण्यासाठी तरी ज्येष्ठ महिलांची घराघरातून मनधरणी चालू होते. पण सध्या मात्र खरेपाटातील परिसरात पावसाळ्यात दिसणार्‍या रानभाज्या लुप्त होताना दिसत आहेत. पहिल्या पावसाचा शिडकाव होताच आदिवसी समाजाकडून मिळणारी भारंगीची भाजी आता गावामधून औषंधा पुरती ही उपलब्ध होताना दिसत नाही. तशीच पस्थिती आलंबी,कंटोल या बाबतीत ही होत आहे.

आदिवाशी समाजाच्या उत्पनाचे साधन असणार्‍या या रानभाज्या एकेकाळी परिसरातून भरपूर प्रमाणात उपलब्ध होत असत. गावकरी या भाज्यांचा आवडीने आस्वाद घेत असत. पण डोंगर भागात होणार्‍या फॉर्महाउसमुळे डोंगरांमुळे या भाज्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. आदिवाशी समाजाचा उत्पनाची साधन बदलू लागली. रानावनातून भटकंती करून उदरनिर्वाह करणारा हा समाज आता मोलमजुरी, शेती, नोकरी, धंदा याकडे वळत चालला आहे. त्यामुळे पारंपारिक असणार्‍या या रानमेवा, रान भाज्या विक्रीचा त्यांचा ओढा आता कमी झाला आहे. या बाबत आदिवासी समाजाच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पूर्वीप्रमाणे डोंगारात, जंगलात वेळ घालवूनही रानभाज्या जास्त प्रमाणात मिळत नाहीत त्यामुळे कष्ट करूनही हातात पुरेसे पैसेही मिळत नाहीत. त्यामुळे हा हातबट्याचा व्यवहार सोडवा लागत असल्याची भावना त्याने व्यक्त केली. सध्याच्या कुमार वयातील मुलांना अनेक रानभाज्यांची नावेही माहित नसल्याचे दिसत आहे. भारंगी, कंटोळ हे काय असत अशी विचारणा त्याच्याकडून केली जात आहे. भरपूर खनीज, पौष्टीक, चवीष्ट असणार्‍या या रानभाज्या आता दुर्लभ होत आहेत हे नव्या पिढीच्या दृष्टीकोनातून तोटा करणारे आहे. कोरोनामध्ये ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या रानभाज्यांचा नक्की उपयोग होऊ शकतो. याचा विचार करून रान भाज्याचे संवर्धन करण्यासाठी कृषीविभागाने पाऊल उचलण्याची गरज आहे. जिल्हाकृषी अधिकारी व शेती तज्ञ यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहावे. या रान भाज्यांचे संवर्धन करावे अशी मागणी रानभाजीप्रेमी कडून होत आहे.

Exit mobile version