मिनी गुढ्यांना नागरिकांकडून मागणी

उरण बाजारात मिनी गुढ्यां दाखल

| उरण | वृत्तसंस्था |

गुढी म्हणजे आनंद, विजय आणि स्वागताचे प्रतीक उंच बांबूपासून गुढी तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंबाचा, पाला , फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर – धातूचे भांडे (तांब्या) बसवला जातो. नंतर गुढी पाटावर उभी केली जाते. याच गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरूहोते. यंदा येत्या मंगळवारी म्हणजेच 9 एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे.

गुढीपाडवा मंगळवार (दि.9) रोजी असल्याने उरण बाजारात ठीक-ठिकाणी मिनी गुढ्या विकावयास आल्या असून नागरिक त्या खरेदी करण्यास नागरिकांची लगबग सुरु आहे . सध्याच्या धावपळीच्या युगात साहित्याची जमवाजमव करून गुढी उभारण्यासाठी पुरेसा वेळही मिळणे कठीण झाले आहे तसेच मोठी गुढी उभारायला शहरात जागेचाही प्रश्‍न असतो. याला पर्याय – म्हणूनच रेडिमेड गुढीचा नवा ट्रेण्ड निर्माण झाला आहे. बाजारात या मिनी गुढ्या – विक्रीस येऊ लागल्या आहेत. लहानात लहान 6 इंच असून दोन फुट पर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. पाट आणि त्यावर असलेले नक्षीदार कापड, नारळ, तांब्या, आंब्याची पाने, गुढीभोवती असलेले कापड, हार इत्यादी सर्व साहित्याचा समावेश रेडिमेड गुढीमध्येही पाहावयास मिळतो. त्यामुळे या सगळ्या साहित्याची जमवाजमव करण्यापेक्षा या रेडिमेड गुढ्या घेण्याकडेच लोकांचा ओढा अधिक दिसून येत आहे. सुंदर नक्षीकाम, चमकदार कापड व आकर्षक सजावटीमुळे या मनमोहक रेडिमेड गुढ्या खरेदी करण्याचा मोह नागरिकांना होत असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.

या पार्श्‍वभूमीवर उरण येथील बाजारपेठांमध्ये विविध आकाराच्या आकर्षक गुढ्या ग्राहकांना भुरळ घालत आहेत. गेल्या चार- पाच वर्षांपासून रेडिमेड गुढीचा ट्रेण्ड बाजारात आला असून अलिकडे या छोट्या गुढ्यांना ग्राहकांची जास्त मागणीआहे. साधारण 80,120,140, 200 ते 250 रुपयांपर्यंत विविध आकाराच्या गुढ्या बाजारात उपलब्ध आहेत. असल्याचे हरीलाल जनरल स्टोअर्स चे मालक यश मेहता यांनी सांगितले.

Exit mobile version