अलिबागनगरीचे नामांतर मायनाक नगरी करण्याची मागणी

जिल्हाधिकारी डॉ.म्हसे यांना दिले निवेदन

| कोर्लई | वार्ताहर |

अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, कोकण रत्न पुरस्कार प्राप्त नवीनचंद्र बांदिवडेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमारातील पहिले आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांचे वारस मिनेश मायनाक यांच्या मालकीच्या मेघा टॉकीज अलिबाग येथील सभागृहात महासंघाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मायनाक भंडारी यांच्या खांदेरी किल्ल्यावरील पराक्रमाचा व त्यांच्या शौर्याचा खरा इतिहास लपवला गेला आहे. हि आपल्या भंडारी समाजाची घोर चेष्टा आहे. तो मायनाक भंडारी यांचा त्याचप्रमाणे भंडारी समाजाचा अपमान आहे. हा लपवला गेलेला इतिहास आपल्या सर्वांच्या सहकाराने कसा उघड होईल, त्याची दुरुस्ती कशी होईल या करीता आपले सर्वांचेच प्रयत्न आहेत.

आरमार प्रमुख मायनाक भंडारी, दौलत खान यांनी खांदेरी किल्ला उभारताना त्यांनी केलेल्या शौर्य व पराक्रमाची अभूतपूर्व इतिहासात नोंद आहे. 19 सप्टेंबर 1679 पर्यंत आरामाराचा शेकडो वर्ष अनुभव असलेले इंग्रज हे सागरी युद्धात अपराजित होते. ज्या मायनाक भंडारींनी शौर्य गाजविला त्याच बेटाला कान्होजी आंग्रे यांचे नाव दिले आहे. ते राहू दे तसेच आम्हाला वाद सुध्दा घालायचं नाही. अलिबाग हि रायगड जिल्ह्याची राजधानी आहे. त्या अलिबागचे नामांतरण मायनाक नगरी झाले पाहिजे हा आमचा हट्ट आहे. पनवेलला इंटरनॅशनल एअर पोर्ट होतेय त्याला दि.बा.पाटील यांचे नाव दिले आहे. ते आगरी समाजाचे नेते होते, लढवय्ये होते, लोक नेते होते. मग मायनाक भंडारी यांनी स्वराज्यासाठी कमी काम केलंय का? भागोजी कीर यांनी कमी काम केलंय का? रत्नागिरीच्या प्रवेशद्वाराला भागोजी कीर यांचं नाव दिलं आहे. तो लढा सुध्दाआम्हीच दिलाय आणि हा आमचा दुसरा लढा आहे. हा आमच्या अस्मितेचा लढा आहे. उद्या जरी तुरूंगात जाण्याची वेळ आली तरी तुरूंगात जाण्यास तयारी आहे. मायनाक भंडारी हि आमची अस्मिता आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर, कार्याध्यक्ष विनोद चव्हाण, खजिनदार जगदीश आडिवरेकर, उद्योजक प्रफुल्ल मोरे, भाऊ घुमकर, भंडारी समाज मुरुड तालुका अध्यक्ष विजय तथा बाबू सुर्वे, रायगड जि.संपर्क प्रमुख सुधाकर पाटील, रा.जि.महिला सं.प्र.विजया कुडव, विश्‍वस्त रिटा मिठबावकर, पदाधिकारी महासंघ शलाका पांजरी, शरद पांजरी, श्रीवर्धन कसबा पेठ भंडारी समाज अध्यक्ष बाबू खापणकर, मिनेश शिवलकर, रेवदंडा-चौल भंडारी समाज हितवर्धक मंडळाचे उपाध्यक्ष प्रशांत जाधव, सदस्य संदीप खोत, अलिबाग ता.प्रमुख सुरेश खडपे, गणेश गुळेकर, सुहास पोलेकर यांच्या सह जेष्ठ-श्रेष्ठ समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version