धोकादायक सुरुचे झाड तोडण्याची मागणी

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

मुरूड पर्यटन क्षेत्र असून या ठिकाणी पर्यटकांची ओघ वाढत आहे. या ठिकाणी पर्यटक व स्थानिक नागरिक समुद्रकिनारी ये-जा करित असतात. समुद्रकिनार्‍यालगत असणार्‍या सुरूचा झाड सुशोभिकरणाच्या खोदकामामुळे हे झाड कमकुवत होऊन पडलेल्या अवस्थेत दिसत असल्याने या झाडापासून नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो.

नगरपरिषदेने तात्काळ लक्ष देऊन हे झाड तोडून पर्यटकांना व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष-अरविंद गायकर यांनी मुरूड जंजिरा नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुरूड जंजिरा नगरपरिषद मार्फत मुरूड समुद्रकिनार्‍यावर सुशोभिकरणाचे काम जोरदार सुरू असल्याने समुद्रलगत असणार्‍या मरीना हॉटेलसमोरील गटार खोदकामामुळे सुरुचे झाड मुळातून कमजोर झालेले दिसून येत आहे. हे झाड भयानक परिस्थिती असून पहिल्या पावसात हे झाड पडुन सभोवती असणार्‍या दुकानांचे स्टॉलचे आर्थिक नुकसान करु शकते. झाडालगत असणार्‍या विद्युत तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित होऊ शकतो. यामध्ये जीवितहानी सोण्याची शक्यता आहे. यासाठी नगरपरिषदेने झाड तोडून नागरिकांना व पर्यटकांना दिलासा द्यावा, अशी मागणी अरविंद गायकर यांनी केली आहे.

Exit mobile version