| नागोठणे | प्रतिनिधी |
भगवान महावीर स्वामी यांची जयंती ही जैन समाज बांधवांसाठी आणि सर्व प्राणी मात्रांसाठी महत्वाची मानली जाते. याच दिवशी अहिंसेचा आणि शांततेचा संदेश देण्यात येत असल्याने असा हा पवित्र दिवस मंगळवारी 31 मार्च रोजी येत आहे. याच दिवशी भगवान महावीर यांची जयंती नागोठण्यातील जैन समाज बांधवांकडून उत्साहाने साजरी करण्यात येणार आहे. यामुळे नागोठणे शहरातील सर्व कत्तलखाने तसेच मटण व चिकन विक्रीची दुकाने 31 मार्च रोजी बंद ठेवावीत, अशी मागणी भारतीय जैन संघटना, रोहाच्या नागोठणे शाखेचे अध्यक्ष गौतम जैन व पदाधिकाऱ्यांनी नागोठणे ग्रामपंचायतीकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. नागोठणे ग्रामपंचायतीला हे निवेदन देताना भारतीय जैन संघटनेचे नागोठणे शाखा शहराध्यक्ष गौतम जैन, सचिव प्रफुल्ल जैन, जुगन जैन, कमलेश जैन, जयंतीलाल जैन, श्रीपाल जैन, रितिक जैन, संजय जैन, हितेश जैन, पंकज जैन, विकेश जैन, बंटी जैन आदी जैन समाज बांधव यावेळी उपस्थित होते.






