आरोपीच्या सुनेवर गुन्हा दाखल करा

आदिवासी समाजाची मागणी

| म्हसळा | वार्ताहर |

म्हसळा तालुक्यातील खारगाव येथे काही महिन्यांपूर्वी बाप आणि मुलाने अनेक अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून गर्भवती ठेवल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर दोघांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये एकूण तिन गुन्हे दाखल आहेत. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. पीडित मुलीने आपल्या जबाबात आरोपी दीपक पाटील यांची सून घरी असताना त्यांनी प्रेगनेन्सी टेस्ट करण्यासाठी स्ट्रिप्स आणून दिली, अशी माहिती दिली होती. त्यामुळे पिडीत मुलींना झालेल्या त्रासामध्ये त्यांच्या सुनेचाही पाठिंबा असल्याचे स्पष्ट होत आहे. या जबाबामुळे ही बाब गंभीर स्वरूपाची असून त्याची सखोल चौकशी करून आरोपीच्या सुनेवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आदिवासी समाजाचे नेते यशवंत पवार आणि पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केली आहे. त्याबाबतचे निवेदन म्हसळा पोलीस ठाण्यात लेखी स्वरूपात देण्यात आले आहे.

Exit mobile version