| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर सेक्टर 15 ते 18 परिसरातील नागरिकांना खारघर रेल्वे स्थानक गाठण्यासाठी बस क्रमांक 53 व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारची वाहतूक सुविधा नसल्यामुळे गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे खारघर रेल्वे स्थानक ते वस्तूविहार या मार्गावर नवीन बस सुरू करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन नंदू वारुंगसे यांनी आगार व्यवस्थापकाकडे केली आहे.
खारघर सेक्टर 15 ते 17 मध्ये जवळपास चार हजार नागरिक वास्तव्य करीत आहे. शिवाय या परिसरात चार शाळा आहेत. या भागात नवी मुंबई परिवहन विभागाकडून एनएमएमटीची 53 क्रमांकाची एकमेव बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे इतर कोणताही पर्याय नसल्याने नागरिकांना पायी जावे लागते. तर खारघर टोल नाका येथील बस थांबा गाठावे लागते. तसेच 50 ते 60 रुपये भाडे देऊन खारघर रेल्वे स्थानक गाठावे लागत असल्यामुळे वारुंगसे यांनी तुर्भे आगारचे व्यवस्थापक सुनील जगताप यांची भेट घेऊन येथील मार्गावर नवीन बस सुरू करण्याची मागणी केली आहे.
घरकुल ते वास्तुविहार बससुरु करण्याची मागणी
