। चिरनेर । वार्ताहर ।
चिरनेर ते पनवेल या मार्गावर एसटी बससेवा फार कमी प्रमाणात धावत आहे. त्यामुळे पनवेल ते चिरनेर या मार्गावर एसटी बस सेवा फार त्रासदायक ठरत असल्याने, नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून एनएमएमटी बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
दरम्यान, चिरनेर परिसरातील नियमित प्रवासी व विद्यार्थी प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. परिणामी या मार्गावरील प्रवाशांना जास्त भाडे देऊन खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. ही खासगी प्रवासी वाहने पूर्ण भरल्याशिवाय सोडत नाहीत. त्यामुळे नोकरी धंद्यावर पोहोचणार्या कामगारांना वेळेत पोहोचता येत नाही. त्यामुळे अशा प्रवाशांची मोठी हेळसाड होत आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या महानगरपालिकेने या मार्गावरील ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी पनवेल ते चिरनेर अशी एनएमएमटीची बस सेवा सुरू करावी अशी मागणी येथील प्रवाशी वर्गातून होत आहे.
पनवेल-चिरनेर बस सुरू करण्याची मागणी
