| पाली/बेणसे | वार्ताहर |
वाढते वीज बिल व डोंगराळ भागात होणारा विजेचा लपंडाव यासंदर्भात आम आदमी पार्टी सुधागडच्यावतीने बुधवारी (ता.12) पाली वीज महावितरण कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी आपच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य वस्तुस्थिती सांगितली. या निवेदनात म्हंटले आहे की वाढत्या विजबिलाबाबत तालुक्यातील जनतेला वीज महावितरण महामंडळाने अतिशय त्रस्त केले असून वाढीव वीज बिल पुढील कारणाने येत आहे. मिटर रिडींग 30 दिवसांनी घेतली जात नाही. काही ठिकाणी विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी वेळेवर रीडिंग न घेतल्यामुळे सामान्य जनतेस भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच खेड्या,पाड्यात, डोंगराळ भागात वाढीव विज बिल भरून सुद्धा विजेच्या होणाऱ्या सतत लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या सर्व गोष्टी आम आदमी पार्टी सुधागड यांनी वीज महामंडळाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत, व योग्य ती कारवाई कराण्याची मागणी केली. यावेळी हरिश्चंद्र शिंदे, अशोक रायकर, अल्ताफ पानसरे, इरफान शेख, फैसल महाडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.