| पनवेल | वार्ताहर |
खारघर येथे राहणार्या 27 वर्षीय तरुणीसोबत इंस्टाग्रामवर मैत्रीचे संबंध जुळवून तिचा अश्लील व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ मित्र, नातेवाईक यांना पाठवण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. याप्रकरणी रेहान खान नामक इसमाविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
27 वर्षीय पीडित तरुणीला इंस्टाग्राम आयडीवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती एक्सेप्ट केल्यानंतर ते दोघे चॅटिंग करू लागले. त्यांनी त्याचे नाव रेहान खान असे सांगून तो युके देशात राहतो असे सांगितले. त्यामुळे त्यांच्यात मैत्रीचे संबंध निर्माण झाले. त्यानंतर एकमेकांना व्हॉट्सअॅप नंबर शेअर केल्यानंतर ते चॅटिंग करू लागले. रेहानने पीडित तरुणीला व्हिडिओ कॉल केला. यावेळी त्याने तरुणीचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केला. युके देशातून कपडे, ज्वेलरी व मेकअपचे सामान पाठवले आहे, ते उद्या भारतात आल्यानंतर टॅक्स पैसे भरावे लागतील असे सांगितले. त्या गोष्टीला नकार दिल्याने तुझी लाईफ आता बरबाद करतो, असे बोलून 20 हजारांची मागणी केली. त्याला नकार दिला, त्यावेळी अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केला असून, पैसे दिले नाहीस तर व्हिडिओ नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना पाठवून बदनामी करेन, अशी धमकी दिली. यावेळी त्याने रेकॉर्ड केलेला नग्न व्हिडिओ पीडित तरुणीला पाठवला. व्हिडिओ व्हायरल करू नको असे सांगितले असता त्याने वारंवार पैशांसाठी फोन, मेसेज करू लागला. पैसे न पाठवल्याने रेकॉर्डिंग केलेला व्हिडिओ मित्र, नातेवाईक यांना व्हॉट्सअॅपद्वारे पाठवून दिला.