। पोलादपूर । वार्ताहर ।
तालुक्यातील उनैसर्गिक आपत्तीवर व भविष्यात उद्भवणार्या पूर सदृश्य स्थितीवर मात करण्यासाठी आज सोमवारी सावित्री नदी पात्रात व सवाद येथील नदीपात्रात पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी स्वतः होडी चालवून रेस्न्यू टीमला प्रशिक्षण दिले.
यावेळी सीस्केप महाडचे सदस्य व स्थानिक मदत कार्य करणारे तरुण सहभागी झाले. महापुरात रेस्न्यू ऑपरेशन कसे करायचे, मदत कार्य करताना कोणती काळजी घ्यावी लागते याविषयी माहिती आणि मार्गदर्शन तहसीलदार कपिल घोरपडे यांनी केले.महाड शहरात वास्तव्यास असलेल्या या एनडीआरएफ पथकाला पोलादपूर तालुक्यातील आपत्ती काळात पाचारण केल्यानंतर काही वेळातच हे पथक मदतकार्यासाठी उपलब्ध होईल, अशी माहिती तहसीलदार घोरपडे यांनी दिली.