| चिपळूण | वार्ताहर |
डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयातील जय किसान ग्रुपच्या कृषीदुतांनी रामपूर येथे क्लायमेट रिसायलेंट एग्रीकल्चर टेक्नॉलॉजी या फळपीक लागवड तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक शेतकरी पांडुरंग कातकर यांच्या शेतात दाखवले. यावेळी कृषिदूतांनी व कृषी अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून देत सांगितले की, या तंत्रात पाण्याचा कमी वापर करून उत्पादन सुधारले जाते. यामध्ये विशिष्ट परिमाणासह खड्डे खोदणे, पाणी आणि पोषक तत्वांचे शोषण सुलभ करण्यासाठी वाळू आणि कंपोस्टने भरलेले पाईप ठेवणे धोरणात्मक आहे. यावेळी उपकृषी अधिकारी डी.के. काळे, मंडल कृषी अधिकारी दत्तात्रय आवारे, सहाय्यक कृषी अधिकारी अमित मोटे व कृषिदूत तेजस चोथे, वैभव पवळ, प्रतीक माळी, ओंकार भापकर, उदयनराजे भोसले, तुषार भाबड, मंगेश पिसे, अमित माळी, पुरुषोत्तम माळी, विराज कणसे, भारतकुमार बिराजदार आदी उपस्थित होते.






