शून्य मशागत लागवडीचे तंत्राचे प्रात्यक्षिक

शेतीची कामे होणार सोपी

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी मुंबई येथील युनायटेड वे हि एनजीओ काम करीत आहे. याच माध्यमातून भात लागवडीची शून्य मशागत पद्दतीने प्रशिक्षण दिले जात आहे. त्यात भात लागवडीची एसआरटी पद्दत यशस्वी करणारे तंत्रज्ञानांची माहिती आणि प्रात्यक्षिक देण्यासाठी सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्रात शेतकरी आले होते.

शून्य मशागत लागवडीचे तंत्र कृषी रत्न शेतकरी शेखर भडसावळे यांनी शोधून काढले आहे. या शून्य मधागत तंत्रामुळे भाताची आणि अन्य पिकांची शेती करणे सोपे झाले आहे. या तंत्राचा वापर करून शेती करणे सोपे जावे यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सगुणा रीजन्टरिंग तंत्राचा अवलंब करावा यासाठी युनायटेड वे ही संस्था पुढाकार घेत आहे. याच माध्यमातून वारे ग्रामपंचायतीमधील शेतकऱ्यांसाठी सगुनाबाग येथे शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणास आदिवासी बहुल भागातील गावातील नागेवाडी, मार्गाचीवाडी, मोरेवाडी, डोंगरपाडा, वारे, खांडस, इष्टे जांभूळवाडी, बांगरवाडी, पेटारवाडी आणि गावंडवाडी येथील 22 शेतकरी आवर्जून उपस्थित होते. सदर प्रशिक्षणास जल संजीवनी प्रकल्प, कर्जत टीम सदस्य मंगेश बोपचे, जोएब दाऊदी, विवेक कोळी, गायत्री ऐनकर, जयश्री ऐनकर, अमर पारधी, जगदीश भला, दीपक कवठे आणि प्रमोद धादवड हे उपस्थित होते.

सदर प्रशिक्षण आयोजित करण्यामागचा उद्देश हा हवामान बदलामुळे शेतीवर होणाऱ्या दुष्परिणामांना आधुनिक पद्धतींचा उपयोग करून सामोरे जाऊन शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावणे आहे.कमीत कमी मशागतद्वारे किमान खर्चात पिकांची उत्पाकता वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी संस्था कार्यरत आहे. शेतकऱ्यांनी एसआरटी तंत्रज्ञानचा अवलंब आपल्या शेतात अशा आधुनिक पद्धत आत्मसात करून प्रगती साधावी असे आवाहन युनायटेड वे मुंबईचे मुकेश देव यांनी केले.

Exit mobile version