| पनवेल | वार्ताहर |
‘मोदी हटाव, देश बचाव’ या घोषणांनी आपचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ पनवेलमध्ये काँग्रेस आणि ऑल इंडिया ह्युमन राइट्स यांच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
पनवेल शहरातील काँग्रेस भवन तसेच, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ही निदर्शने करण्यात आली. मोदी सरकारने जाणीवपूर्वक अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकले आहे, या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुदाम पाटील, ऑल इंडिया वुमन्स राईटच्या विनिता बर्फे, शेतकरी कामगार पक्ष पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू तसेच, युवा नेते हेमराज म्हात्रे, कामगार नेते वैभव पाटील, सुरेश पाटील, माजी नगरसेविका नगरसेविका शशिकला सिंह, सुधीर मोरे, शशिकांत बांदोडकर, अरुण आदम ठालाईत, ऑल इंडिया ह्युमन् राईटच्या आरती सोनवणे, सिप्रा लोंढे, जयश्री खटकाले, दिपाली लोंढे उपस्थित होत्या.