पनवेलमध्ये डेंग्यू-मलेरियाची साथ

अनेकजण आजारी

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यात डेंग्यू-मलेरियाची साथ असून, अनेक जण आजारी आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

पावसाळ्याला सुरुवात झाल्यापासून पनवेल तालुक्यात नागरिक आजारी पडण्याची संख्या वाढू लागली आहे. मलेरिया, डेंग्यू आणि इतर आजारातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास संपूर्ण कुटुंबच आजारी पडत आहे. त्यात लहान मुलांना याचा अधिक त्रास होतो. पनवेल पंचायत समितीमार्फत आरोग्य विभागाने तालुक्यातील जुलै महिन्यात 8 हजार 592 जणांची तपासणी केली. यात 98 जणांना मलेरिया झाला, तर 40 जणांना डेंग्यू झाला. ऑगस्ट महिन्यात मलेरियाच्या 6 हजार 655 जणांची तपासणी केली. यात 92 रुग्णांना मलेरिया झाला, तर 21 जणांना डेंग्यू झाला. सहा सप्टेंबरपर्यंत 1 हजार 44 जणांची तपासणी करण्यात आली असून, यातील 11 जणांना मलेरिया झाला आहे. त्यामुळे मलेरिया होण्याचे प्रमाण वाढू लागले असल्याचे दिसत आहे. मच्छरांचे प्रमाण वाढू लागल्याने ग्रामपंचायतीने फवारणी करणे गरजेचे आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक आणि सरपंचाने गावांमध्ये मच्छर फवारणी करावी. रुग्णसंख्या वाढू लागल्याने काही डॉक्टर याचा फायदा घेत असल्याचे समोर आले आहे. फ्री डेमोसाठी येत असलेल्या गोळ्यादेखील काही डॉक्टर आदिवासी बांधवांना विकत असल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे.

Exit mobile version