अलिबाग ते श्री क्षेत्र नारायणपूर पायी दिंडीचे उद्या प्रस्थान

अलिबाग | वार्ताहर |
दत्त सेवेकरी मंडळ श्री क्षेत्र नारायणपूर यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे दत्त जयंती निमित्त अलिबाग ते श्री क्षेत्र नारायणपूर पायी दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवारी (9 डिसेंबर) या पालखीचे पिंपळभाट येथे आगमन होणार आहे.
अलिबाग येथील एस टी आगारातील गणपती मंदिरामध्ये पूजा, अभिषेक व आरती करून पालखी अलिबाग बाजारपेठेतून समुद्रकिनारी जाऊन गंगा – सागर पूजन व पादुका पूजन करून पालखीचे प्रस्थान होईल ही दिंडी 17 डिसेंबर रोजी अखंड प्रवास करून श्री क्षेत्र नारायणपूर येथे दत्त जयंती उत्सव सोहळ्यासाठी पोहोचणार आहे. अलिबाग शहर व तालुका परिसरातून सर्व दत्त भक्तांनी या दिंडीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन वैभव घरत, संतोष गायके, अशोक पाटील ,उमेश पाटील यांनी या प्रसिद्ध पत्रकातून केली आहे.

Exit mobile version