| खांब | प्रतिनिधी |
सालाबादप्रमाणे याही वर्षी खांब ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा दि. 20 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. कृष्णा जाधव व नडवली यांनी ही पायी दिंडीची परंपरा चालू केली असून त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली ही पायी दिंडी नडवली-खांब येथून सोमवारी (दि.20) सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. या दिंडी सोहळ्यात रोहा तालुक्यासह संपुर्ण रायगड जिल्ह्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने वारकरऱ्यांनी सहभाग घेऊन पायी वारीचा आनंद घेत असल्याचे सांगण्यात आले. या दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी नामदेव यादव, मारूती कोलाटकर, प्रकाश थिटे, सदानंद जाधव, कृष्णराम धनवी, एकनाथ मरवडे, गणेश जाधव, ज्ञानेश्वर लोखंडे, अजय पार्टे, शांताराम महाडिक, देविदास भोईर, नथुराम जाधव, भूषण वरखले, प्रेम चव्हाण, तुकाराम महाडिक, राम लोखंडे,होनाजी कोल्हटकर, राधिका लोखंडे, शुभांगी महाडिक, शांताबाई गायकर,सुनिता शिंदे आदी दिंडीच्या प्रमुखांसह अन्य वारकरी सदस्य मोलाचे सहकार्य करीत आहेत.







