नैराश्य झटका,कामाला लागा माजी आ.पंडित पाटील यांचे आवाहन

मुरुड | वार्ताहर |
नैराश्य झटकून अपयशानंतर यश प्राप्त होत असते हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेशी संपर्क साधून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.प्रश्‍न सुटत नसेल तर वरिष्ठ नेत्यांची भेट घ्या पण जनतेचे प्रश्‍न सुटलेच पाहिजे यासाठी प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्नशील राहिला पाहिजे. लवकरच आगामी निवडणुकांना सामोरे जाताना गतीशीलता प्राप्त करून पक्षाची मते वाढवण्याचा प्रयत्न करा असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आ. पंडित पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले आहे.
शेकाप कार्यकर्त्याची बैठक माजी आमदार पंडितशेठ पाटील यांच्या शीघ्रे येथील निवास्थानी संपन्न झाली .

मुरुड तालुका शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस मनोज भगत .जेष्ठ नेते तुकाराम पाटील,माजी सरपंच अजित कासार,मनोहर बैले, अल्पसंख्याक अध्यक्ष रिझवान फईम,,विजय गिदी,राजपुरी ग्रामपंचायत सरपंच हिरकणी गीदि,आदी मान्यवर व प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी तालुका चिटणीस मनोज भगत यांनी कार्यकर्त्यांनी आपसातील मत भेद बाजूला सारून पक्ष कार्यासाठी मेहनत घ्यावी असे ते यावेळी म्हणाले.यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगामी निवडणुकीत नेत्रदीपक कामगिरी करण्यासाठी मेहनत खूप आवश्यक आहे.ज्यांना लोकांनी निवडून दिले ते जनतेचा विश्‍वास व प्रश्‍न सोडवू शकलेले नाहीत.जनतेचा विश्‍वास संपादन करण्यासाठी कार्यरत रहा.
पंडितशेठ पाटील,माजी आमदार

Exit mobile version