खोपोली नपासाठी वंचितची मोर्चेबांधणी

प्रक्षप्रवेश,सभासद नोंदणीला प्रतिसाद
। खोपोली । वार्ताहर ।
वंचित बहुजन आघाडीने खोपोली शहरात पक्ष मजबुतीकडे लक्ष दिले असून, तरूणांसह महिलावर्गाने जाहिर प्रवेश केला असून सभासद नोंदणीला प्रतिसाद दिला आहे. आगामी होणार्‍या पालिकेच्या निवडणुकीत सर्व सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याचा इशारा शहराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी बोलताना दिला आहे. नालंदा बुध्दविहार सभागृहात पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला.यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सर्वजीत बनसोड, प्रियादर्शी तेलंग यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शहर अध्यक्ष दिपक गायकवाड, महासचिव आशिष मणेर, सुमित जाधाव, रोहित वाघमारे यांच्या सह वंचित आणि भारतीय बौद्धमहासभा खोपोली शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यवराच्या उपस्थित प्रभाग क्र. 3 मधील सामाजिक कार्यकर्ते आजेश अगवणे अणि त्यांच्या पत्नी अपर्णा अगवणे(गुरव) यांनी त्यांच्या मित्र परिवारासहित पक्ष प्रवेश केला.एकाच आठवड्यात 712 सभासद नोंदणी करण्यात आली असून जास्तीत जास्त सभासद करण्याचा संकल्प केला असल्याचे शहर अध्यक्ष दिपक गायकवाड यांनी सांगितले आहे.

Exit mobile version