| श्रीवर्धन | वार्ताहर |
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणच्या शेतकऱ्यांना सोयाबीन, कांदा, टोमॅटोसाठी शासनाकडून मदत दिली जाते. परंतु कोकणातल्या शेतकऱ्यांना देखील यापुढे मदत करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
श्रीवर्धन शहरासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प व पाणीपुरवठा योजना तसेच समुद्रकिनारा सुशोभीकरण या कामांचे उद्घाटन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीवर्धन येथे आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.कोकणातला शेतकरी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेत नाही. आंबा, काजू, नारळ, सुपारी यांच्या बागा व फळांची पिके घेऊन कोकणातील शेतकरी आपला उदरनिर्वाह करत असतो, असेही पवार म्हणाले.