मुंबई । प्रतिनिधी ।
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुनावण्यात आलेली कोठडी शुक्रवारी संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. यावेळी झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकिलांनी अनिल देशमुख यांची आणखी तीन दिवस कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर दोन्ही बाजुंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने अनिल देशमुख यांना तीन दिवसांची म्हणजेच 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यावेळी ईडीच्या वकीलांनी अनिल देशमुख यांची आणखी तीन दिवस ईडी कोठडी देण्याची मागणी न्यायालयात केली. सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांची एकत्रित चौकशी करायची आहे, त्यामुळे ईडीने कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती.