डेसमंड टूटू यांचे निधन

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आयुष्यभर वर्णभेदाविरोधात लढणारे दक्षिण आफ्रिकेचे संघर्ष नायक, नोबल शांती पुरस्कार विजेते आणि आफ्रिकेचे माजी आर्चबिशप डेसमंड टूटू यांचे निधन झाले. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या निधनाने एका संघर्ष युगाचा अंत झाल्याची भावना जगभरात व्यक्त केली जात आहे. 1990च्या दशकात डेसमंड टूटू यांना प्रोस्टेट कॅन्सर झाला होता. त्यामुळे उपचारासाठी त्यांना अनेकवेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वृद्धापकाळामुळे शरीर उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने आज अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

Exit mobile version